शोधा गं ... शोधा गं...फांदी -फांदीवर शोधा गं....
हाती जे जे येईल त्याचा प्रत्यय नसेल साधा गं...
गोजिरवाण्या संसारातच सुखाचा रस्ता सोपा गं....
झोका गं... झोका गं ...फांदी-फांदी वर झोका गं...
अवखळ निर्भीड उत्साहातच आयुष्याच्या मौजा गं ...
धोका गं ... धोका गं...फांदी-फांदी वर धोका गं...
खळगे-काटे-साप-मुंगळे चुकवत जगणे शिका गं...
मोहोर गं.. मोहोर गं... फांदी-फांदी वर मोहोर गं...
फुला -फळांच्या रस-स्वादाची गोडी केवळ थोर गं...
पाचोळा गं... पाचोळा गं... सांदी-फटीतून पाचोळा गं...
बहरा अंती सुकण्याचा ना नियम चुकला कोणा गं...
थांब गं... थांब गं... फांदी कुठेशी सांग गं...?
फांदी -फांदी जोडत जाता झाडच मिळते अखंड गं....
_ जुई
डेरेदार !!!
ReplyDeleteपाचोळा गं... पाचोळा गं... सांदी-फटीतून पाचोळा गं...
ReplyDeleteबहरा अंती सुकण्याचा ना नियम चुकला कोणा गं...
apratim :)