तशी मीही अजून जागीच आहे...
पण निजेला परतवते आहे ... कारण तू ही जागा आहेस.
चल,
वाऱ्यावर तरंगत आलेल्या या मोहक क्षणाचा हात धर...
आणि मांजर-पावलांनी अलगद ये माझ्या बरोबर...
तशी आपल्या सुखाची फुलं उमलली आहेतच ...
पण हवेत सुगंध भरलाय... तो बहुदा चांदण्यांचा.
ऐक,
सगळीकडची निरव शांतता...
निश्वासांचे हुंकार सुद्धा विरघळून गेल्यासारखी ...
तशी मी तुझ्या कानात गुज सांगते आहे...
पण कुठूनशी कुजबुज ऐकू येतीये ... ती रातराणीची
बघ,
सगळं शहर झोपेच्या धुक्यात बुडलंय.
त्याच्या वर-खाली होणाऱ्या श्वासांच्या लाटेवर झुलताना वाराही मंद झालाय...
तसा थोडा गारवा आहे हवेत...
पण शहारा आलाय... तो तुझ्या स्पर्शामुळे...
थांब,
बोलू नकोस काही ... आणि हलू नको जरासुद्धा..
हा क्षण संपण्याआधी साठवून घे मला तुझ्यात..
तशी पौर्णिमाच आहे आज...
पण चंद्र अवचित ग्रासलाय ... तो तुझ्या माझ्या एकांतासाठी...
___जुई
This comment has been removed by the author.
ReplyDelete'पण हवेत सुगंध भरलाय... तो बहुदा चांदण्यांचा.' askhkya jamalaiye he oal,hats off!!
ReplyDeletepersonally i really, experience ghetlya sarkhe watat ahe..
jabrya..
पण चंद्र अवचित ग्रासलाय ... तो तुझ्या माझ्या एकांतासाठी.
ReplyDeleteआवडली कविता
Khup sundar!
ReplyDelete