तू असा शेजारी गाढ झोपलेला..
श्वासांची संथ लय
माझा हात तुझ्या छातीवर ठेवलेला
तुझ्या हृदयाचे ठोके
हाताला जाणवणारे
निश्चित … आणि आश्वासक
ते ठोके मी मोजत राहते
त्यांच्या लयीवर माझ्या मनात उमटणारं
संगीत ऐकत राहते
ओळखीचं … आणि मोहक
त्या संगीताच्या पार्श्वभूमीवर
माझ्या दुसऱ्या हाताची बोटं
तुझ्या मऊ केसातून फिरू लागतात
त्यांचा स्पर्श माझ्या बोटातून
मनापर्यंत पसरत जातो
रेशमी …आणि सुखावणारा
केसातून फिरणारी बोटं
मग कानाच्या पाळीशी
लडीवाळपणे खेळतात
आणि गालावरून भुवईचं वळण घेऊन
नाकाच्या सरळ रेषेत खाली येतात
तिथे पुन्हा तुझ्या श्वासांचं संगीत जाणवतं
धीमं… आणि संयत
तुला कल्पना नाही
पण केवळ तुझ्या झोपेतही
माझ्या जाणीवा
तू अश्या जिवंत करतोस
आणि तुझ्या असण्यामुळे
माझे श्वास होतात
लयबद्ध .. आणि किती तरी समृद्ध!
छान!
ReplyDeleteआठवणीतील आरसे
ReplyDeleteते अविस्मरणीयसे
अबोल काळोखाचे
बोलके चांदणेही
दिधे द्वीनेत्री कधी...